… तर ‘या’ काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचा इशारा.

सध्या देशात काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून काँग्रेस नेते आपापल्यात भिडल्याचे चित्र दिसून येत आहे. काहींच्या मते काँग्रेसचे अध्यक्ष पद हे गांधी घराण्यातील व्यक्तीकडे राहावे तर काहींनी मात्र आता काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा देण्याची मागणी केली आहे.

याच वादाचे पडसाद महाराष्ट्रात देखील दिसून आले आहे. ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं त्यात महाराष्ट्रातल्या मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण मिलिंद देवरा या तिघांचा समावेश होता. काँग्रेसला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा ही प्रमुख मागणी करत या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. पण काल संध्याकाळपासूनच काँग्रेसमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ एक मोहीम सुरु झाली आहे. त्यामुळे हे पत्र लिहिणारे तेवीस नेते पक्षात एकटे पडत आहेत असं चित्र निर्माण झाला आहे. त्यात महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना अशा पद्धतीने उघड इशारा दिल्याने त्याची चर्चा होत आहे.

मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते त्यांना राज्यात मोकळेपणाने फिरु देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

हे तीन नेते आज पत्र लिहून सांगत आहेत, पण त्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले असा प्रश्न सुनील केदार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केला. शिवाय २०१४ च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे पक्षाचं वाटोळं झालं, असा आरोप देखील केला. त्यामुळे अध्यक्षपदावरुन आता काँग्रेसमधला अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचे दिसतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *