सोनिया गांधी सोडणार काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद, कोण असणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष?

देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अंतर्गत घडामोडी सुरू असून, पक्षाचे गेल्या वर्षभरापासून हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेल्या सोनिया गांधी यांनी पद सोडण्याची घोषणा केली असून अध्यक्षपदावरील एक वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण झाला असल्यामुळे आता आपण अध्यक्षपद सोडणार असल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच सध्या अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून पक्ष दोन गटांत विभागला गेला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यापैकी एका गटाकडून करण्यात येत आहे. तर दुसऱ्या गटाकडून गांधी परिवारातीलच कोणीही अध्यक्षपदी यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

उत्सुकता नव्या नेतृत्वाची

प्रियांका गांधी यांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत गांधी घरण्याबाहेरचा असावा असे बोलून दाखविले होते. त्यामुळे आता काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष पक्षाला गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली आहे. काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. प्रभावी नेतृत्त्वाची पक्षाला गरज आहे. असे त्यांनी पत्रात सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *