गुड न्यूज. ! भारतीयांना मिळणार कोरोनाचे मोफत लसीकरण

covaccine first test successful

भारताच्या पहिल्या कोरोना लसला तयार होण्यासाठी ७३ दिवसांचा अवधी लागणार असून ‘ कोविशिल्ड ‘ ही भारतीय लस ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड लस ही पुण्यातील बायोटेक कंपनी सिरम इंस्टीट्युड ने विकासात केली आहे. भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशातील नागरिकांना मोफत लसीकरण देण्यात येणार आहे.

केंद्र सरकार थेट सिरम इंस्टीट्युड कडून कोविशिल्ड लस खरेदी करून भारतीयांना कोरोनाची लस मोफत देण्यात येईल असे संकेत केंद्र सरकार कडून देण्यात आले आहे. हेभारत सरकार जून २०२२ पर्यंत सिरम इंस्टीट्युड कडून ६८ कोटी लस खरेदी करणार आहे. मात्र देशातील जनसंख्या १३० कोटी असल्याने बाकीचे काय ? सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित लसींची पूर्तता करण्यासाठी सरकार आयसीएमआर आणि भारत बायो टेक यांच्या कोवक्सिन तसेच खाजगी फार्मा कंपनी Zydus Cadila यांच्या द्वारे विकसित होत असलेल्या ZyCov-D कंपनीला ऑर्डर देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *