साईशांती युवा गणेश मंडळ, गडचांदूरच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

उद्या दिनांक २४/०२०२० ला साईशांती युवा गणेश मंडळाच्या वतीने साईशांती नगर, शिक्षक कॉलोनी प्रभाग क्रमांक २ येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपणार्‍या रक्तदात्यांना रक्तदान करण्यास समोर येण्याचे आवाहन साईशांती युवा गणेश मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

मंडळातर्फे दरवर्षीच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमाचे पालन करून शिबीर पार पाडणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच  जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आव्हान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

रक्तदान करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी खालील मंडळाच्या सदस्यांशी संपर्क करावा

वैभव राव – ७०३८३३२३६६
निलेश चिने – ८६६८५५८२५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *