कृषी खातं झोपलं आहे काय ? राज्यमंत्री बच्चू कडू यांचा महाविकास आघाडीला घरचा अहेर

राज्यातील सरकार शेतकऱ्यां प्रती गंभीर नसून राज्यातील कृषी खात झोपलं  आहे काय ? असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला आहे.

विदर्भात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या सोयाबीन पीक संकटात सापडलं असून अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.

“ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे”, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.

“राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय” असा सवाल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *