ऐकावे तर नवलच. ! पती खूप प्रेम करतोय, म्हणून पत्नीला हवाय घटस्फोट.

सामान्यतः आपण पाहतो की पतीने मारझोड केली, पती दारू पितो, पती मानसिक त्रास देतो, पतीचे दुसऱ्या सोबत अनैतिक संबंध आहे अशा कारणावरून एक पत्नी आपल्या पतीकडून घटस्फोट घेत असतात. परंतु उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणातील घटस्फोटाचे कारण ऐकून तुम्हाला देखील धक्का बसणार आहे.

जेव्हा या महिलेला घटस्फोटाचे कारण विचारण्यात आले. तेव्हा त्या महिलेने पती आपल्यावर खूप प्रेम करत असून ते आपण पचवू शकत नाही. लग्नाला १८ महिने झाले असून या दरम्यान तो एकदाही आपल्यावर ओरडला नाही. त्याने कोणत्याही मुद्द्यावरून आपल्याला नाराज केले नाही, अशा वातावरणात माझा श्वास कोंडू लागला आहे. कधीकधी तर तो माझासाठी जेवण बनवितो. मला स्वयंपाकात मदत करतो. मी जे सांगतो ते तो मान्य करतो, मी वाद घालण्याचा प्रयत्न केला तरी तो माझे बोलणे हसत ऐकतो. मला कधीही उलट सुलट उत्तर देत नाही. अशे आयुष्य मला जगायचे नाही असे उत्तर घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या महिलेने दिले.

हे उत्तर ऐकून शरिया न्यायालयाच्या मौलवींनी तिचा अर्ज बाद केला असून हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *