मोदी सरकारचा मोठा निर्णय ! देशभरात सरकारी नोकरीसाठी आता होणार एकच सामायिक परीक्षा.

केंद्रातील मोदी सरकारने आताच शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता मोदी सरकारने नोकरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या देशभरातील तरुण-तरुणांसाठी मोठा निर्णय घेतला असून आता वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी एकच सामायिक परिक्षा द्यावी लागणार आहे. नोकरीसाठी परीक्षा देणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा ताण कमी व्हावा म्हणून National Recruitment Agency स्थापन करण्यात येणार आहे. त्याद्वारे एकच CET घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे.

शिक्षण झाल्यानंतर नोकरीसाठी मिळवण्यासाठी युवा वर्ग अनेक मार्ग निवडत असते. प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपापल्या परीक्षा ठेवतात आणि नोकरी मिळवण्याच्या हेतून तरुण या सगळ्या परीक्षा देतात. मात्र, इथून पुढे असे करण्याची गरज राहणार नाही. पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे हे चित्र पालटण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे.

काय आहे निर्णय ?

या संस्थेत एकदा नोंदणी केली की, एकच परीक्षा देऊन आपली योग्यता युवकांना सिद्ध करावी लागेल. त्यामुळे नोकरीसाठी दारोदारी परीक्षा देत भटकण्याची वेळ युवा पिढीवर येणार नाही. प्रकाश जावडेकर यासंदर्भात माहिती देताना म्हणाले, “युवकांना जागोजागी परीक्षा द्यायला जावं लागू नये म्हणून एकच सामान्य पात्रता परीक्षा असेल. यात गुणवत्ता सिद्ध करून उमेदवारांना पुढे जाण्याची संधी मिळू शकेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *