देशातील स्वच्छ शहरांमध्ये चंद्रपूरचा समावेश, बघा कोणते स्थान मिळाले चंद्रपूरला.

केंद्र सरकार कडून स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्वच्छ शहरांच्या वार्षिक सर्वेचा निकाल जाहीर करण्यात आला. मध्य प्रदेशातील इंदूर शहराने पुन्हा एकदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिले स्थान कायम राखले. इंदूर शहराने सलग चौथ्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरण्याचा मान पटकावला आहे.

दुसर्‍या क्रमांकावर गुजरातमधील सुरत, तर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई शहर आहे. राज्यातून चंद्रपूर ९ व्या, धुळे १७ व्या तर नाशिक २३ व्या क्रमांकावर आहेत.

जानेवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या सर्वेक्षणाचे हे पाचवे वर्ष आहे. ‘स्वच्छ महोत्सव’ अंतर्गत अव्वल कामगिरी करणारी एकूण १२० शहरे व राज्ये सन्मानित करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये ४ हजार २४२ शहरे, ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ९२ गंगाकाठच्या शहरांचा समावेश होता. हे सर्वेक्षण २८ दिवसांत करण्यात आले

सर्वेक्षणातील पहिल्या वर्षी म्हैसूरने भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार जिंकला होता, तर इंदूरने सलग तीन वर्षे अव्वल स्थान कायम राखले.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

१. इंदूर (मध्य प्रदेश)
२. सुरत (गुजरात)
३. नवी मुंबई (महाराष्ट्र)
४. अंबिकापूर (छत्तिसगढ)
५. म्हैसूर (कर्नाटक)
६. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
७. अहमदाबाद (गुजरात)
८. नवी दिल्ली (दिल्ली)
९. चंद्रपूर (महाराष्ट्र)
१०. खारगोने (मध्य प्रदेश)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *