सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर पार्थ पवारांनी दिली “सत्यमेव जयते” अशी प्रतिक्रिया.

Will Parth Pawar take a big decision

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावर आता सीबीआय चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय कडे सोपविण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत प्रकरण सीबीआय कडे देण्यात यावी अशी मागणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ एवढंच पण सूचक ट्वीट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडचीही किंमत देत नाही, अशा शब्दात फटकारलं होतं. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असं ट्वीट केलं आहे.

मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला असून गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *