नोकरीत जनावरांना करण्यात आले लसीकरण उपसरपंच वामन तुराणकर यांचा पुढाकार

चंद्रपूर जिल्हामध्ये पशुधनावरती ‘लंपी’ या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असुन हा रोग संपुर्ण खेड्या पाड्यात पोहचला आहे. सध्या शेतीचा हंगाम चालु आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचा प्राणप्रीय व शेती उपयोगी आसलेले बैल व आर्थिक बल देनारी गाय अस्या प्राण्यांना ग्रासले आहे. यावर ठोस कुठला ऊचार नसला तरी पशुधन लवकर बरे व्हावे व या रोगाचा प्रसार रोकता यावा यासाठी नोकारी(खु) येथे जनावरांना लसीकरण करण्यात आले व येथे आजारी जनावरांना वेगळे करुन व तंदुरस्त जनावराना वेगळे करुन लसीकरन करन्यात आले.

यासाठी वामन तुरानकर ऊपसरपंच यांनी सुनीलभाऊ ऊरकुडे पशुधन व कृषी सभापती जि.प.चंद्रपुर यांचेशी संपर्क केला व सभापती महोदयानी अवघ्या १२ तासांत कॅप लावुन १७५ जनावराना लसीकरन करन्यात आले. यासाठी डाॕ.नेटके पशुधन विकास आधीकारी गडचांदुर तसेच साह्यक ईस्माईल शेख यांचे कुषल कार्य व मेहनती रीमझीम पावसात रविवारी सुध्दा यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *