मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.

Raj Thackeray new looks viral in social media

नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुनील ईरावर यांच्या आत्महत्येने खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे अस्वस्थ झाले असून राज ठाकरे यांनी सुनील ईरावर याच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना अनिल यांनी अक्षरशः हंबरडा फोडला.

राज ठाकरे यांनी सुनील यांचे भाऊ अनिल ईरावर यांचे फोनवरुन सांत्वन केले. काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन, काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला दिला.

नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले आहे. “अरे बाबांनो, जात आणि पैश्यात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे पण माझा सहकारी कोलमडून पडतो तेव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरुन जातं..”

राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *