नवनीत राणांनी कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली.

Navneet rana on Sanjay raut

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने पहिले त्यांना नागपूर आणि नंतर पुन्हा मुंबईला उपचारासाठी हलविण्यात आले होते. पण, अखेर नवनीत राणा यांनी कोरोनाला मात दिली असून लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

खासदार नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील १२ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. सुरुवातीला नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत उपचार करण्यात आले होते. परंतु श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु नागपूरला सुद्धा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले. त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र लीलावती रुग्णालयात उपचार सुरू झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या व त्यांना आता सुट्टी देण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी फेसबुक व्हिडिओ करून आपण बरे झाले असून आयसीयूमधून बाहेर पडलो आहोत, अशी माहिती खुद्द राणा यांनी फेसबुक व्हिडिओ करून दिली.

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून बाहेर आली आहे. अनेक लोक माझ्यासाठी चिंता करत होते, प्रार्थना करत होते. या प्रार्थनांमुळे मी मरता मरता वाचले. माझी तब्येत आता ठीक आहे. देवाने मला पुन्हा एक संधी दिली पाहिजे, अशी मी प्रार्थना करत होते. कारण मला माझ्या लोकांसाठी काम करायचं आहे. आपल्या आशीर्वादमुळे मी आज वाचले. सगळ्यांचे धन्यवाद,’ असं त्यांनी या व्हिडिओतून म्हटलं होतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *