राज्यपाल एकदम फिट..! ५० मिनिटांत भरपावसात सर केला शिवनेरी.

Governor bhagat sing koshyari visit shevneri ford

राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांनी आपण फिट असल्याचे दाखवून दिले आहे. ७८ वर्षाचे राज्यपाल भगत सिंग कोष्यारी यांनी भरपावसात अवघ्या ५० मिनिटांत शिवनेरी सर केला.

हा गड माझ्यासाठी मोठा नाही. पाऊस असला तरी मी पायीच चढणार, मला हेलिकॉप्टरची गरज नाही. असं म्हणत एका दमात ते ही अवघ्या ५० मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आरती ही केली. राज्यपालांच्या सोबतीला स्थानिक आमदार अतुल बेनके उपस्थित होते. राज्यपालांच्या या धाडसाचे भाजप खासदार संभाजीराजे यांनी देखील कौतुक केलं आहे.

 

 

महाराजांचे विचार अंमलात आणणारा खरा शिवभक्त असल्याचं राज्यपाल बेनके यांच्याकडे म्हणाले. ते केवळ महाराज नव्हे तर एक अवतार होते. असे अवतार जिथं जन्म घेतात ती भूमी पवित्र असते. म्हणून याठिकाणी येण्याचं मी ठरवलेलं होतं. असं बेनके यांच्याकडे मनमोकळेपणाने बोलले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन मोहिमेत सरकारने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच केली गेली. त्यामुळे राज्यपालांनी जो प्रत्येक मंत्र्याला गड दत्तक घेण्याची सूचना केली ती रास्त आहे. असे खासदार संभाजीराजे म्हणाले.

त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे पुन्हा एक विनंती केली. ती म्हणजे दरवर्षी कॅबिनेटची एक बैठक रायगडवर घेण्याचे आदेश आपण द्यावेत. जेणेकरून महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल. स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *