दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन.

मेवाती सांगितिक घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीत मार्तंड जसराज यांचे न्यू जर्सी येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांसह संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

२८ जानेवारी १९३० ला हरियाणाच्या हिसार येथे जन्मलेले पंडित जसराज हे मागील ४ पिढ्यांची परंपरा पुढे चालवत होते. त्यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्याचे संगीतज्ञ होते. पंडित जसराज यांनी जसंरगी नावाने एका वेगळ्या चालीच्या जुगलंबदीची देखील रचना केली होती.

सप्टेंबर २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने १३ वर्षांपुर्वी शोधलेल्या एका ग्रहाला पंडित जसराज असे नाव देत त्यांना सन्मानित केले होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अंटार्कटिकाच्या दक्षिणी ध्रुवावर आपली कला सादर केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *