भाजपा महिला आघाडी गडचांदूर तर्फे सोशल मीडिया प्रतिनिधींचा सत्कार कार्यक्रम संपन्न.

गडचांदूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोरोनाच्या महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता काना कोपऱ्यातील बातम्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करणाऱ्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा सत्कार सोहळा पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने व रक्षा बांधनाचे औचित्य साधून गौरव प्रमाणपत्र भाजपच्या महिला आघाडी च्या सौ निताताई क्षीरसागर, सौ शकुंतला ताई कोसरे तसेच मा. संजय भाऊ धोटे यांचे हस्ते कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनजागृतीचे तसेच शासनाच्या वेळोवेळी सूचना जनतेपर्यंत पोहचविण्याचे उत्तम रित्या पार पडणारे गडचांदूर येथील सोसिअल मिडियाचे पत्रकार बंधुल यांना गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सतिश धोटे, राधेश्याम अडानिया नगरसेवक राजुरा, सतीश उपलेंचिवार, निलेश ताजने, महेश शर्मा, शिवाजी शेलोकर, अरविंद डोहे, रामसेवक मोरे, अरविंद कोरे, बबलू रासेकर, विलास क्षीरसागर, अजीम बेग, वैभव राव, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *