महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाने देखील घेतली निवृत्ती.

जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना काल महेन्द्र सिंह धोनी याने निवृत्ती घेतल्याने मोठा धक्का बसला. त्यातच आता त्याच्या पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सुरेश रैनाने क्रिकेट मधून सन्यास घेतल्याचं जाहीर केलं आहे.

सुरेश रैनाने धोनी आणि टीम इंडियाच्या काही सहकाऱ्यांसोबत एक फोटो शेअर केला आहे. माही, तुमच्या सोबत खेळणे शानदार राहिले. तुमच्या कारकिर्दीत खेळायला भेटले याचा अभिमान आहे इत, धन्यवाद भारत, जय हिंद, असे शब्द सुरेश रैनाने धोनीसाठी लिहले आहेत.

सुरेश रैना आणि महेंद्र सिंह धोनी यांची मैत्रि जगजाहिर आहे. दोघेही अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स टिमकडून खेळत आहेत. दोघांनीही अनेकवेळा ऐकमेकांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुरेश रैनाच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट करियरमध्ये १८ टेस्ट मॅच, २२६ वनडे सामने आणि ७८ टी-20 इनटरनॅशनल मॅचमध्ये खेळला आहे. रैनाने एक शतक आणि सात अर्धशतकच्या जोरावर टेस्ट क्रिकेटमध्ये ७६८ रन बनवले आहेत. तर वनडेमध्ये रैनाने पाच शतक आणि ३६ अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. यादरम्यान, ३५ च्या सरासरीने ५६१५ रन काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *