‘राजसाहेब मला माफ करा’ म्हणत मनसे शहराध्यक्षा ने केली आत्महत्या.

मनसेचे नांदेड शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं असून त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी टोकाचे पाऊल उचलले. इरावार यांनी काल (शनिवार 15 ऑगस्ट) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे

यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील”

“आई, पपा, काका, काकू , मोठी वहिनी, छोटी वहिनी, शिवा दादा, शंकर दादा, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही. तरी पण तुम्ही सर्व जण मला माफ कराल, अशी आशा बाळगतो.” असे सुनील इरावार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *