भेंडाळा येथील सामाजिक सभागृहाचे वास्तू पूजन संपन्न.

राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड. संजयभाऊ धोटे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या राजुरा तालुक्यातील मौजा भेंडाळा येथे सामजिक सभागृहाचा वास्तू पूजन कार्यक्रम देवस्थान कमीटी तर्फे करण्यात आला,तसेच सामजिक सभागृह मंजूर करून दिल्याबद्दल माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे यांचा गावकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

माझी आमदार अँड. संजय धोटे यांनी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता सामाजिक सभागृहासाठी निधी मंजूर करून दिला होता. सदर काम पूर्ण झाल्यानंतर देवस्थान कमीटी तर्फे सभागृहाचा वास्तू पूजनाच्या वेळी गावकऱ्यांनी माझी आमदार अँड. संजय धोटे यांचा सत्कार करून त्यांनी गावकऱ्यांना केलेल्या मदतीसाठी आभार व्यक्त केले. यावेळी गावातील नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *