लोकतंत्र सेनानी महेश शर्मा यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

गडचांदूर येथील रहिवासी महेश शर्मा हे मूळचे बिहार राज्याचे रहिवासी असून गडचांदूर येथे मागील ४० वर्षा पूर्वी गडचांदूर येथे वस्त्यव्यास आले तेव्हा पासून ते भाजप पक्ष्याचे एकनिष्ठ राहिले व त्यांनी पक्षात अनेक पक्ष संघटनांचे पद भूषविले.

बिहार राज्यात रहिवासी असताना सन १९७४ ला स्व इंदिराजी गांधी यांचे सरकार च्या काळात दमनकारी नीतीचे विरोधात स्व लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात छ्यात्र(विध्यार्थी) आंदोलन व संपूर्ण क्रांती आंदोलनात महेशजी शर्मा यांनी सक्रिय भाग घेतला. त्यानंतर संपूर्ण देश्यात सन १९७५ ला आणीबाणी लागू केली. तरी पण हे आंदोलन सातत्याने मार्च १९७७ पर्यंत चालू राहिले.त्या दरम्यान मा महेशजी यांना ३ महीने तुरुंगवास भोगावा लागला.

त्यानंतर काही दिवसात आणीबाणी संतुष्ठात आली.परन्तु कोर्ट केसेस चालूच होत्या त्यानंतर १९७७ ला मोरारजी देसाई यांचे सरकार आले.व त्यांचे काळात सम्पूर्ण केसेस मागे घेण्यात आल्या. त्याची दखल घेऊन सन २००८ ला त्यांना बिहार सरकार कडून प्रतिमाह १०,००० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला व तेव्हा पासून त्यांना मानधन मिळत आहे. अश्या लोकतंत्र सेनानी यांचा १५ आगस्ट चे औचित्य साधून राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार मा.संजय भाऊ धोटे यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले त्यावेळी मा सतिशजी धोटे,राधेश्याम अडाणी राजुरा,गडचांदूर शहराचे अध्यक्ष सतीश उपलेंचिवार,शिवाजी शेलोकर,निलेश ताजने,अरविंद डोहे,रामसेवक मोरे,अरविंद कोरे,संदीप शेरकि, बबलू रासेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *