गडचांदूर भाजपा तर्फे कोरोना योध्यांचा सत्कार

भारतीय जनता पक्ष गडचांदूरच्या वतीने कोरोनाच्या महामारीत महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थ व नियोजन मंत्री मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने गौरवपत्र देत आशा वर्कर,व वैधकिय अधिकारी तथा कर्मचारी यांनी स्वतःच्या आरोग्याची चिंता नकरता कोरोनाच्या संकटात आशा वर्कनी घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे उत्तम कार्य केले त्याबद्दल त्यांचा सत्कार करून त्यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच रक्षाबंधनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला मोर्च्या च्या वतीने वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी यांना राखी बांधून त्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळेस भाजपा महिला आघाडी मोर्चा च्या माजी नगराध्यक्षा सौ विजयालक्ष्मी डोहे,भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या सौ रंजनाताई मडावी,गडचांदूर शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार,निलेश ताजने,अरविंद डोहे,आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *