आंतरजिल्हा बससेवा चालू होण्याची शक्यता,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर संपूर्ण राज्यातील बससेवा बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल यामुळे बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मागील चार महिन्यांपासून बंद बससेवा चालू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील आंतरजिल्हा एस. टी. बससेवा कोविड नियम पाळून चालू करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत याबाबत चर्चा झाली असून ते सकारात्मक असून पुढील आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. ऐन संकटाच्या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवा सोडणाऱ्या डॉक्टरांवर देखील कठोर कारवाही करणार असून प्रसंगी मेस्मा कायदा लावणार असल्याचा देखील त्यांनी यावेळी इशारा दिला.

राज्यातील कोचींग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रे कोरोनाचे नियम पाळून प्रारंभ करण्याची सरकारची तयारी आहे. जिमप्रमानेच स्पर्धा परीक्षा केंद्रे चालू करण्याचा विचार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *