पार्थ पवार मोठा निर्णय घेणार ? ‘ऑपरेशन लोटस’ ला पवार घराण्यातून सुरवात होणार ?

Will Parth Pawar take a big decision

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात मोठा पेच निर्माण झाला आहे. पवार कुटुंबियांत अजूनही ‘ऑल इज वेल’ नाही आहे. अशा चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यावरुन वाद निर्माण झाला, त्यामुळे आता पार्थ पवार हे मोठा निर्णय घेऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ हे पवार यांच्याच घरातून सुरू होमणार काय? अशी चर्चा रंगली असून शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केल्याने शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही मोठे नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केल्याने महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ सक्रिय झाले काय ?  अशी चर्चा रंगु लागली आहे.

सुप्रिया सुळे मंत्रालयात अजित पवारांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. १० मिनिटं अजित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळे मंत्रालयातून बाहेर पडल्या. मतदारसंघातील कामासाठी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कालच अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्यावर टीका केली होती. पार्थ पवार हे इमॅच्युअर आहेत आणि त्यांच्या मागणीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर अजित पवार आणि पार्थ पवार तसंच राष्ट्रवादीकडूनही अजून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *