विराट कोहलीच्या संघात खेळणार ‘विदर्भाचा पोट्टा’ आदित्य ठाकरे

vidarbha bowler aditya thakare gets selected for ipl virat kohli team royal challengers bangalore

यंदाचे आयएलपी यूएईमध्ये खेळवले जाणार असून यंदा कोणता संघ आयपीएल मध्ये फॉर्मात असणार यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघात गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा पोट्ट्या! ‘आयपीएल’साठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.

vidarbha bowler aditya thakare gets selected for ipl virat kohli team royal challengers bangalore

आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. २०१८ मध्ये झालेल्या १८ वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये लागल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *