यवतमाळ अर्बन बँकेतर्फे आशा वर्कर्संना छत्री वाटप.

Latest news in marathi

यवतमाळ अर्बन बँक यांच्या तर्फे गडचांदूर येथे आशा वर्कर्संना छत्री वाटपाचा अभिनव उपक्रम घेण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा यांच्या संकल्पनेतून व प्रशांत माधमशेट्टवार यांच्या मार्गदर्शनाखाली नारांडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्य करत असणाऱ्या ३० आशा वर्कर्संना छत्र्या वाटप करण्यात आल्या.

आशा वर्कर्स ह्या खऱ्या कोरोना योद्धा असून घरोघरी जाऊन कार्य करत असल्यानेच कोरोना बाबत जनजागृती व कोरोनाचा प्रसार रोखला जात आहे. असे प्रतिपादन यावेळी डॉ. स्वप्नील टेंभे यांनी केले. तसेच बँक नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन जोपत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्कर्स सत्कार केल्याने आपणास समाधान वाटत असल्याचे सतीश उपलंचीवर यांनी म्हटले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सतीश उपलंचीवर, आशुतोष चटप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील टेंभे, आरोग्य सहाय्यक सेवाकर टोंगे, विभागीय विपणन अधिकारी अरुण राऊलकर, गडचांदूरच्या माझी नगराध्यक्ष सौ. विजयालक्ष्मी डोहे, निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, रंजना मडावी, आनंद हिंगणे, व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *