चंद्रपुरातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली एक हजाराजवळ

Corona updates in India

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९८८ वर पोहोचली असून यापैकी कोरोनातून ५८९ बाधित बरे झाले आहेत. तर सध्या ४०० बाधितांवर उपचार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल ९४४ बाधितांची संख्या होती. आज सायंकाळपर्यंत ९८८  वर पोहोचली आहे. चंद्रपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सुरवातीला कोरोनापासून दूर असणाऱ्या चंद्रपुरात रोज नवीन रुग्ण आढळत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात १२ ऑगस्टच्या मध्यरात्री ६५ वर्षाच्या महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. ही महिला कन्नमवार वार्ड बल्लारपूर येथील असून कोरोनामुळे झालेला जिल्ह्यातील सातवा मृत्यू आहे.

आज पुढे आलेल्या नव्या कोरोनाबाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील २४, चंद्रपूर तालुक्यातील तीन, राजुरा, नागभिड, गडचांदूर येथील प्रत्येकी एक, बल्लारपूर शहरातील ९, गोंडपिपरी येथील ५ बाधितांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *