परीक्षा नाही तर पदवी नाही, यूजीसीची कडक भूमिका

अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सर्व विद्यापीठांनी ३० सप्टेंबर पर्यन्त घ्यावा असा आग्रह धरणार्‍या विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी मिळणार नाही अशी कडक भूमिका सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे.

कायद्यानुसार विद्यार्थ्यांना पदवी देण्याचा व कधी व कशी परीक्षा घ्यायची हे ठरविण्याचा अधिकार फक्त आयोगास आहे. राज्य सरकारे विद्यापीठांना परीक्षा न घेण्याचे सांगू शकत नाही. अशी माहिती यूजीसीच्या वतीने तुषार मेहता यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंतिम परीक्षा न घेता आधीच्या वरच्या कामगिरीच्या आधारे पदवी देण्यात यावी अशा दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहे. मात्र यूजीसीने आपल्या निर्णयाचे ठाम समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र केले.

मात्र सुयोग पद्धतीने परीक्षा घेऊन विद्यार्थाने आत्मसात केलेल्या ज्ञानाचे मूल्यमापन केल्याशिवाय त्यांना पदवी दिली जाऊ शकत नाही असा कायदा असून परीक्षा झालीच नाही तर पदवी काशी मिळणार हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा असे यूजीसी चे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *