दहा हजारासाठी केला साळीचा खुन

विहिरीचे बांधकाम करण्यासाठी साळीला उसने दिलेले दहा हजार रुपये परत न केल्याने संतप्त झालेल्या भाटव्याने सख्या साळीचा धारदार शस्त्राने खून करण्याची घटना भद्रावती शहरातील फुकटनगर वस्तीत आज दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.

सकाळी १० वाजताच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेला कचरा फेकण्यासाठी बाजूला गेली. त्यावेळी ती शेजारच्या महिलेसोबत बोलत असताना भालचंद्र तेथे गेला व त्याने दिलेल्या पैशाची मागणी केली. तेव्हा संगीताने दोन महिन्या नंतर पैसे परत करणार असे सांगितले. त्यामुळे भालचंद्र व संगीता यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या भालचंद्रने सतूराने संगीताच्या पोटावर वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली.

तिला जखमी अवस्थेत तिच्या गौतम नामक मुलाने तात्काळ भद्रावती ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून संगीतास मृत घोषित केले. दरम्यान, साळीवर प्राणघातक हल्ला करून भालचंद्रने स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अटक करवून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार संगीता प्रकाश कांबळे वय ४५ वर्षे रा.बेसा ता.वणी असे मृतक महिलेचे नाव आहे. ती फुकटनगर वस्तीमध्ये स्वतःच्या घरी आपल्या पती व मुलाबाळासोबत राहत होती. तिच्याच घराच्या समोर तिचे सख्खे भाऊजी  भालचंद्र रामा मून वय ६० वर्ष याचे घर आहे.

भालचंद्र रामा मून याने संगीताला विहिरीच्या बांधकामाकरिता दहा हजार रुपये उसने म्हणून दिले होते. परंतु ते पैसे तिने परत केले नाही. पैशाकरिता भालचंद्र तगादा लावतो म्हणून संगीता पती व मुला मुलीसह बेसा येथे राहायला गेली होती. मुलाच्या गाडीचे फायनान्स भरण्यासाठी ती भद्रावतीला आली असता तिच्या हा हल्ला झाला त्याच तिचा जीव गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *