भारताचे माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोंनाची लागण.

Former president Pranav mukharji passes away today

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली असून प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहले की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत असून देशातील राजकीय नेते तसेच व्हीआयपी व्यक्तींना कोरोनाच्या विळख्यात जात आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह, अभिनेता अमिताभ बच्चन, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियूरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहितही, यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २२१५०७५ वर पोहचला असून देशात सध्या ६३४९४५ रुग्णांवर उपचार चालू आहे. १५३५७४३ रुग्ण कोरोनामुक्त मुक्त झाले आहे. तर आता पर्यंत ४४३८६ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *