फेसबूक कडून आला एक कॉल आणि वाचले एकाचे प्राण.

A call came from Facebook and saved the life of one

आजचे युग हे सोशल मीडियाचे असल्याचे आपण नेहमी म्हणत असतो. आपण आपल्या मूड नुसार सोशल मीडियावर आपल्या अॅक्टिविटी करत असतो. सोशल मीडियावर लोक आपले मित्र मैत्रिणी, कुटुंब किंवा सोशल नेटवर्किंगसाठी येतात. पण काहीजण निराश मनस्थितीत टोकाचं पाऊल उचलण्यासाठी देखील सोशल मीडियाचा वापर करतात.

अशीच काहीशी घटना शनिवारी घडली. आयर्लंड येथील फेसबुक कार्यालयातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिल्ली सायबर विभागात फोन गेला, डीसीपी अनयेश रॉय याना एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारात आहे, त्याच्या फेसबुक अॅक्टीविटीवरून फेसबुकच्या अधिकृत कार्यालयातून सतर्क करण्यात आले.

संबंधित मोबाईल क्रमांक दिल्लीतील रहिवाश्याचा असून तो पूर्व दिल्लीत राहत असल्याचे समजले. दिल्ली सायबर विभागाने पूर्व दिल्लीतील पोलिसांना डीसीपी जसमित सिंग यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या घरी जाऊन चौकशी केली. हा नंबर रमेश नामक व्यक्तीचा (नाव बदलले) असून तो मुंबईत आहे, पण हा नंबर त्याच्या बायकोच्या नावावर असल्याची माहिती त्याच्या बायकोने दिली. सुरेश मुंबईत शेफ म्हणून काम करतो, पण कुठे राहतो ह्याची माहिती तिला ही नव्हती. दिल्लीच्या सायबर विभागाने मुंबईतील सायबर विभागाला याबाबत त्वरित कळवलं.

मुंबई सायबर विभागाच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर आणि त्यांच्या टीमने सुरेशला संपर्क करण्याचे प्रयत्न केले. त्याचा फोन बंद होता, त्याच्या आईच्या माध्यमातून वॉट्सअप वर संपर्क होतो का हा प्रयत्न केला. मध्येच सुरेशने फोन सुरू केला आणि तेव्हा पोलिसांनी त्याला सायबर पोलिसांनी बोलण्यात गुंगवून ठेवलं. त्याचे स्थान भाईंदर आलं. आणि लगेच भाईंदर पोलिसांना कळवण्यात आलं. सायबर पोलीस आणि भाईंदर पोलीस हे सुरेशपर्यंत पोहोचले. नोकरी गेली, त्यात बाळ झाले, आर्थिक जबाबदारी आणि पत्नीशी वाद त्यामुळे सुरेश निराश झाला होता. त्यामुळे तो टोकाचे पाऊल उचलणार होता. पण पोलिसांनी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहचून त्याला समजावले. त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *