चंद्रपूर वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्थांचे ४६० फूट उंच चिमणीवर चार दिवसांपासून आंदोलन सुरू.

The agitation of the project affected people in Chandrapur continued on the chimney

चंद्रपूर वीज केंद्रासाठी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास कमालीचा विलंब होत असल्यानं हे प्रकल्पग्रस्त वीज केंद्रातील चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. प्रकल्पग्रस्थांना नोकरी लवकरात लवकर देण्यात यावी यासाठी गेल्या चार दिवसांपासून प्रकल्पग्रस्त आंदोलन करत आहे.

वीज केंद्रातील नऊ क्रमांकाच्या संचाच्या चिमणीवर हे आंदोलक चढले असून यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. वीज केंद्रासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. मोबदल्यात एक स्थायी नोकरी देण्याचा करार वीज कंपनीने केला होता. मात्र, अनेक वर्षे उलटूनही नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं प्रकल्पग्रस्तांनी ही विरुगिरी केली. हा संपूर्ण परिसर सीआयएसएफच्या संरक्षणात आहे. तरीही हे आंदोलक चिमणीवर चढल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. चंद्रपूर येथील CISF ची सुरक्षा भेदून महाऔष्णिक वीज केंद्रातील चिमणीवर ८ प्रकल्पग्रस्त चढल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वीज केंद्र प्रकल्पग्रस्त आंदोलक सलग चौथ्या दिवशी चिमणीवर बसून आहेत. शुक्रवारी नागपूर येथे झालेल्या बैठकीत आधी आंदोलकांनी टॉवर खाली उतरावे नंतरच पुढील चर्चा करू, अशी सरकारने अट टाकली. पण प्रकल्पग्रस्तांनी आधी निर्णय घ्या मग उतरू अशी भूमिका घेतली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिकेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत संतापले आणि मीटिंग सोडून निघून गेले. बैठक न झाल्याने प्रकल्पग्रस्तांचे ५ प्रतिनिधी काल रात्री चंद्रपूरला परतले.

यामुळे आता प्रकल्पग्रस्त आणि त्यांचे नातेवाईक आज रस्तावर उतरून आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेली CISF सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *