अभिनेता संजय दत्त रुग्णालयात दाखल, श्वास घेण्यास होत होता त्रास.

Sanjay dutt admitted in lilavati hospital suffering breathing problems

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना उद्या डिस्चार्जही देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

“रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या संजय दत्त यांची ऑक्सीजन लेवल कमी जास्त होत होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. वी. रविशंकर यांनी सांगितले. डॉ. रविशंकर पुढे म्हणाले, की “संजय दत्त यांना सध्यातरी कोविड वोर्डात भरती करण्यात आलेलं नाही. संजय दत्त हे निरिक्षणाखाली असून इतर काही चाचण्या करण्यात येणार आहेत.

संजय दत्त हे लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबापासून लांब होते. त्यांची पत्नी मान्यता दत्त ही दोन्ही मुलांसह दुबईला होते. या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *