एसबीआयमध्ये ३८५० जागांची भरती, वाचा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Recruitment of 3850 posts in SBI

सरकारी नोकरी शोधणार्याा तरुणांसाठी दिलासादायक म्हणजे पदवीधर उमेदवारांसाठी स्टेस बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने ३८५० पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली असून बँकेने सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणजेच सीबीओ पदासाठी अधिसूचना जारी केली असून १६ ऑगस्ट पूर्वी एसबीआयच्या सीबीओ भरती २०२० साठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भरुन दाखल करणे बंधनकारक आहे.

या पदांसाठी अर्ज भरण्याची तारीख ही २७ जुलै २०२० ते १६ ऑगस्ट २०२० पर्यंत आहे. अर्ज १६ ऑगस्टनंतर स्वीकारले जाणार नाहीत. ही भरती ३८५० पदांसाठी आहे. त्यापैकी सर्वाधिक जागा या कर्नाटक आणि गुजरातमध्ये आहे. येथे प्रत्येकी ७५० सीबीओ पदांसाठी भरती आहे. त्या खालोखाल तेलंगणामध्ये ५५० जागा आणि मुंबई विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये ५१७ जागांसाठी भरती होणार आहे. ८५० सीबीओ पदांसाठीही ही भरती म्हणजे बँकेमध्ये नोकरी करण्यासंदर्भातील तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी असून या पदासाठी फ्रेशर्सही अर्ज करु शकतात.

या जागांसाठी शैक्षणिक पात्रतेची मर्यादा ही उमेदवाराने मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठामधून कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले हवे, अशी आहे. त्याचबरोबर उमेदवाराचे वय हे १ ऑगस्ट २०२० पर्यंत ३० वर्षांपेक्षा अधिक असू नये अशीही अट ठेवण्यात आली आहे. एसबीआयच्या वेबसाईटवरुन इच्छुक उमेदवार १६ ऑगस्ट २०२० पर्यंत अर्ज करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *