राज्यात कोरोंनाबाधितांचा नवा उचांक, एका दिवशी १२,८२२ नवीन रुग्णांची नोंद.

Corona updates in India

राज्यात काल (शनिवार) कोरोनाबाधित रुग्णांनी उच्चांक गाठला आहे. आज राज्यात एका दिवसात १२ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. आज राज्यात १२ हजार ८२२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे. यापैकी १,४७,०४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, तर ३,३८,२६२ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण ११ हजार ८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६७.२६ टक्के एवढं आहे. राज्यात आज २७५ करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.45 टक्के एवढा आहे.

राज्यामध्ये सध्या पुण्यात सर्वाधिक ऍक्टिव्ह केस आहेत. पुण्यात आत्तापर्यंत २,६३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यामध्ये आजही कोरोनाचे राज्यातले सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आजच्या एका दिवसात पुणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे १४५७ रुग्ण आढळून आले, तर ३९ जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईमध्ये एका दिवसात कोरोनाचे १,३०४ रुग्ण सापडले आणि ५८ जणांचं निधन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *