कोरोनाच्या पार्श्व भूमीवर गडचांदुरात अस्वच्छता, शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

गडचांदुर शहरात मागील चार महिन्यापासून नालीची योग्य साफसफाई केली जात नाही. सफाई केल्यास त्या कचऱ्याची उचल केली जात नाही. मागील चार महिन्यापासून फॉगिंग मशीन बंद असून ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही. साध्या पंपा ने फवारणी करीत असल्याचे काही दिवसापूर्वी होत असलेले दर्शन ते सुद्धा दुर्लभ झाले आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता अमरावती वरून आलेल्या जावयाची आपल्या आरोग्य विभागाने खबरदारी जास्त घेतली त्यामुळे एवढे रुग्ण वाढीस आले हे नाकारता येत नाही. अश्याच प्रकारे स्वच्छतेच्या ठेकेदारांची खबरदारी घेत असल्याचे चिन्ह दिसत आहे. स्वच्छतेचे काम बंद करून मजूर कोरोनाच्या कामात वापरल्या जात आहे. कोरोना हा विषय जेवढ्या महत्वाचा आहे तेवढाच स्वच्छतेचा सुद्धा आहे हे विसरू नका शहराच्या स्वच्छतेकरिता लाखो -करोडो रुपये दिल्या जात आहे तेव्हा शहराची योग्य साफसफाई होणे गरजेचे आहे.

कोरोनाकरिता शासनाकडून विशेष निधी दिली असताना ते काम वेगळे ठेकेदाराकडून न करता जुन्याच ठेकेदारांकडून काम केले जात आहे. त्यामुळे जुन्या ठेकेदारांकडून स्वच्छतेचे काम बंद आहे. स्वच्छतेचे काम बंद करून करण्याचा हेतू काय? एका दगडात दोन पक्षी मारण्याचा हेतू तर नाही ना अशी शंका भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांनी व्यक्त केली आहे. जिकडे तिकडे कोरोना सोबतच डेंगू मलेरिया,डायरिया,चिकणगुणिया सारखे आजार पसरत असून अशा रोगाला दूर ठेवण्यासाठी शहराच्या स्वच्छतेकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण शहरात एकदा या रोगांचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा त्याला आटोक्यात आणणे कठीण जाईल. त्यामुळे स्वच्छतेकडे ताबडतोब लक्ष देणे गरजेचे आहे.

त्याकरिता भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, आरोग्य सभापतींना
निवेदनातून विनंती केली आहे. आता यावर नगरपरिषद काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *