राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा निमित्य गडचांदूर येथे भाजपा कडून विविध कार्यक्रम करून आनंद साजरा.

दि.५/८/२०२० ला दुपारी ठीक १२.१५ वाजता अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे भूमिपूजन देश्याचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते संपन्न झाले.त्या निमित्याने गडचांदूर मधील सम्पूर्ण प्रभागातील मंदिरात पूजापाठ करण्यात आले.फटाके आतिषबाजी करून मिठाई वाटण्यात आली.त्याचप्रमाने प्रभाग क्र.दोन मधील साईशांती नगर टीचर कालनीत सुद्धा हनुमान मंदिरात दुपारी पूजापाठ करून बुंदिचे वाटप करण्यात आले व जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आला.व सायंकाळी मंदिरात व घरी दीपोत्सव करण्यात आले.तसेच फटाके आतिषबाजी करून आनंद साजरा केला.

त्यावेळेस प्रभाग क्र दोन मध्ये श्री अरविंद डोहे नगरसेवक,सौ विजयालक्ष्मी डोहे माजी नगराध्यक्ष,श्री नामदेवराव मानकर,परशुराम मुसळे,वैभव राव,जयंता भोंगळे,विशाल राव,धनबहादूर बिस्ट, सुमित नागे,नीरज मालेकर, दत्तू पानघाटे आदी उपस्थित होते.तर संपूर्ण प्रभागातील मंदिरात पूजापाठ व दिपोत्सवाचे काम भाजपा शहर अध्यक्ष सतिशजी उपलेंचिवार ,निलेशजी ताजने,रामसेवक मोरे आदीने पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *