ठाकरे सरकारने शेतकरी आत्महत्येसंबंधी बळीराजा चेतना योजना गुंडाळली.

Thackeray government closed baliraja chetna yojana

२०१५ मध्ये फडणवीस सरकारने चालू केलेली शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यसाठी बळीराजा चेतना ही योजना चालू केली होती. मात्र ठाकरे सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली बळीराजा चेतना योजना बंद केली आहे. ही योजना विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे ही योजना बंद करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.

या योजनेमुळे उस्मानाबाद आणि यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये कोणतीही घट न झाल्याने सादर योजना बंद केली असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३२ हजार ६०५ शेतकऱ्यांनी २००१ ते २०१९ या कालावधीत आत्महत्या केल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार होते त्या कालावधीत २०१५ ते २०१८ या कालावधीत १४ हजार ९८९ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *