अयोध्येत जसं मंदिर उभं राहिल तसंच आपल्या मनातही अयोध्या उभी राहायला हवी. – सरसंघचालक मोहन भागवत

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर, न्यायालयीन संघर्षानंतर अखेर अयोध्येत रामजन्मभूमीचा वाद सुटला आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा दिवस उजाडला. या दिवसासाठी प्रभू श्रीरामाच्या अयोघ्या नगरीनं जणू कात टाकली. राम मंदिर उभारणीच्या दृष्टीनं उचलण्यात आलेलं हे पाऊल आणि शिलान्यासाचा विधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. पंतप्रधनानंसह या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह इतर १७५ आमंत्रितांची उपस्थिती होती.

हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचं फळ आज मिळालं आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचं काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसं मंदिर बनेल तसं मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभं राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभं राहायला पाहिजे, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *