भारताने चीनला काश्मीर मुद्द्यावरून फटकारले.

india on china and pakistan on kashmir issue

भारताने आज काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्याचा प्रयत्न करणार्याी चीनला चांगलेच फटकारले असून चीनचा आमच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप अजिबात मान्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले. चीनकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू काश्मीर या भारताच्या केंद्रशासित प्रदेशांसंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर भारताने चीनला चोख प्रतीउत्तर दिले. भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याची चीनची ही पहिली वेळ नसून यापूर्वी त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु अगोदरही आंतरराष्ट्रीय समुदायकडून अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे.

पाकिस्तानने बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनच्या समर्थनाने काश्मीरचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाला कालच एक वर्ष पूर्ण झाले, पण चीन-पाकिस्तानचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती असताना चीनने पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यात यशस्वी झाले नाही. पुन्हा एकदा काश्मीर मुद्यावरून चीन आणि पाकिस्तान तोंडघशी पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *