चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात ६७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद.

Corona updates in India

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा जोरात वाढत असून गेल्या २४ तासात ६७ नवीन कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. आज सर्वाधिक बाधित हे ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. या एकाच तालुक्यातून २८ बाधित पुढे आले आहे. बहुतेक बाधित हे १९  ते  ४० वयोगटातील असून परस्पराच्या संपर्कातून पुढे आले आहेत. ३२१ बाधितावर सध्या जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. ४२६ बाधित जिल्ह्यात आतापर्यंत बरे झाले आहेत.

चंद्रपुरातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या ७४९ वर पोहचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचणी सुरू असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या अधिक आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे अत्यंत आवश्यक असून जिल्ह्यात संपर्कातील बाधिताची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये ब्रह्मपुरी येथील २८, बल्लारपूर येथील १३, चंद्रपूर येथील १३, चिमूर येथील ४, भद्रावती येथील ३, वरोरा येथील ३, गडचांदूर येथील २, व राजुरा येथील एक अशा ६७ बाधिताचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *