सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय कडून ६ जणांवर एफआरआय दाखल

CBI files FIR against six people in Sushant Singh Rajput suicide case

संपुर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या सूशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ६ जणांवर सीबीआय कडून एफआरआय दाखल करण्यात आली आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती, शोभित चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, श्रुती मोदी, सम्युअल मिरिंडा यांचा समावेश आहे.

सीबीआय कडून रिया चक्रवर्ती व इतर ५ जणांवर सुशांत सिंग राजपूत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला गेला असून एक नाव हे अजून समोर आले नाही.

गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस यांच्यातील मतभेद समोर आला होता. सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांनी बिहार पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट दाखल केल्यानंतर बिहार पोलिस मुंबईला आली तेव्हा मुंबई पोलिसांकडून सहयोग मिळाला नसल्याचे बिहार पोलिसांनी म्हटले होते. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी वाढली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआय कडे देण्यात आले. त्यानंतर आज सीबीआय कडून सुशांत सिंग राजपूत याच्या प्रियसी समवेत ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *