कुटुंबांनंतर आता नवनीत राणा यांनादेखील कोरोनाची लागण .

Navneet rana on Sanjay raut

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या कुटुंबातील १० सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं अहवाल आल्यानंतर स्पष्ट झालं आहे. या सदस्यांमध्ये राणांच्या मुलांचाही समावेश आहे. आणि आज नवनीत राणा यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

पती आमदार रवी राणा हे नागपूरला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेत आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. याशिवाय नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. त्यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे.

बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांचे वडील आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर राणा यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीत 10 जणांना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये आमदार-खासदार पती-पत्नींच्या मुलांचा समावेश आहे. या आधी रवी राणा आणि नवनीत राणा यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, राणा दाम्पत्यांचं चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने मोठा गोंधळ उडाला होता. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे तक्रार केली होती.

याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी आणि लक्षणं असल्यास त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन कऱण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *