आजचा दिवस संकल्प आणि त्यागचा प्रतीक आहे. – पंतप्रधान नरेंद्र मोदी

narendra modi speech in ayodhya today

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोदी हे सकाळी अयोध्येत पोहोचलेत. त्यांनी हनुमानगढीवर जाऊन दर्शन घेतले आणि पूजा-आरती केली. त्यानंतर त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात पार पडला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. यापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केले.

  • अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. नंतर संबोधित करताना ते म्हणाले की, आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात समर्पण, त्याग, संघर्ष, संकल्प होता. ज्याच्या त्याग, बलिदान आणि संघर्षाने आज हे स्वप्न साकार होत आहे, त्या सगळ्यांना मी नमन करतो, वंदन करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान आहे. शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेलाय. आज श्रीरामाचा जयघोष केवळ सिया-रामाच्या भूमीतच नाही तर संपूर्ण जगभरात घुमत असून सर्व देशावासियांना, जगभरातील राम भक्तांना आजच्या आनंदाच्या क्षणी कोटी कोटी शुभेच्छा, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय असल्याचं मोदी म्हणाले. ते म्हणाले की, आज देशातील नागरिकांच्या सहकार्यानं हे काम पूर्ण होत आहे. प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे. श्रीराम गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे स्तंभ बनले आहेत. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोनामुळं हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसंच देशातील नागरिकांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *