माझ्या ह्रदयाच्या जवळचं स्वप्न पूर्ण होतय- लालकृष्ण अडवानी

Lal krushn adwani today statement on ram Mandir

राम मंदिराच्या भूमिपूजनाचा अवघे काही तास शिल्लक असताना राम मंदिरच्या आंदोलनातील प्रमूख चेहरा असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न पूर्ण होत आहे, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं की, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होत आहे. अयोध्या येथे राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं अडवानी यांनी म्हटलं.

श्री रामजन्मभूमी येथे भव्य राम मंदिर बांधणे हे भारतीय जनता पार्टीचं स्वप्न आणि मिशन आहे. भाजपने मला १९९० मध्ये रामजन्मभूमी चळवळीच्या वेळी सोमनाथ ते अयोध्या या रथ यात्रेची जबाबदारी दिली होती. या प्रवासाने असंख्य लोकांच्या आकांक्षा, ऊर्जा प्रेरित केल्या. याप्रसंगी राम मंदिर चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या, बलिदान देणाऱ्या, सर्व संतांचे, नेत्यांची आणि लोकांची मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं देखील यावेळी लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *