यूपीएससीचा निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात तर अभिषेक सराफ महाराष्ट्रातून पहिला.

Upsc results declared Pradip sing first in India

संघ लोक सेवा आयोगाने युपीएससी २०१९ चा निकाल जाहीर झाला आहे. प्रदीप सिंहने यूपीएससीच्या सिविल सेवा (मेन्स) परीक्षा २०१९ मध्ये टॉप केलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा आहे.

 महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. UPSC civil Service साठी झालेल्या या परीक्षेत देशभरातून ८२९ महत्त्वाकांक्षी युवक युवतींची निवड झाली आहे.

यूपीएससीच्या सिविल सर्विझ परीक्षेच्या मुलाखती २० जुलैला सुरू झाले होते. याचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. विद्यार्थी यूपीएससीच्या संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. यामुळे एकदा मुलाखत राऊंड रद्द करण्यात आला होता. यूपीएसची प्रीलियम आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा. यंदा लॉकडाऊनमुळे हा तिसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर मुलाखतीला येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य ती सुविधा देण्यात आली होती. यानंतर त्यांचा तिसरा टप्पा पार पडला.

UPSC 2019 चा निकाल www.upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *