कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण.

karnataka chief minister bs yediyurappa tested positive for covid

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना काल ( रविवारी) कोरोना ची लागण झाली. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झालेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी ट्विट करून ही माहिती दिली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी ट्विट केले. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आलीय आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करावं, असं येडियुरप्पा यांनी ट्विटध्ये म्हटलंय.

उत्तर प्रदेशातील भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंहही रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यासर्वांना क्वारंटाइन होण्यासह करोना चाचणी करण्याची सूचना केली आहे. त्यापूर्वी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहितही यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येडियुरप्पा यांच्या आधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रादुर्भाव हा देशातील महत्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहचला आहे.

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या रविवारी १७ लाखांवर गेली आहे. रविवारी ५४, ७३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ८५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. यानुसार देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७, ५०, ७२४ इतकी झाली आहे. यापैकी ५, ६७, ७३० जणांवार सध्या देशात उपचार सुरू आहेत. तर ११, ४५, ६३० जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ३७, ३६४ जरोनाने मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *