महाराष्ट्राचे माझी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन.

ex chief minister manohar joshi wife death

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचे निधन झाले. शिवाजी पार्क येथील राहत्या घरीच अनघा मनोहर जोशी यांची प्राणज्योत मालवली. अनघा जोशी यांनी आज पहाटे (सोमवार ३ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्या ७५ वर्षांच्या होत्या. अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

नोकरी सोडून मनोहर जोशी यांनी नुकतेच कोहिनूर क्लास सुरु केले होते, व्यवसायातले चढउतार, जोशी सरांच्या आणि राजकीय व सामाजिक जीवनातले यश यात अनघा जोशी यांची मोलाची साथ राहिली.

शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री तर ठरलेच, पण राज्याचे पहिले बिगर-काँग्रेसी मुख्यमंत्रीही ठरले. मनोहर जोशी यांच्या बऱ्या-वाईट काळात अनघा जोशी यांनी पतीला खंबीर साथ दिल्याचे बोलले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *