मोठी बातमी..! यूपीच्या मंत्री कमल राणी यांचे कोरोनाने निधन.

uttar pradesh government cabinet minister kamal rani varun dies of Corona

देशातील कोरोनाचा आकडा जोरात वाढत असून देशातील एकूण आकडा साडे सतरा लाखांवर पोहचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता लोकप्रिनिधींनाही होत आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सांभाळणाऱ्या कमल राणी यांचे कोरोनाने निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होता.

६२ वर्षीय कमल राणी वरुण या उत्तर प्रदेश सरकारमध्ये तंत्रशिक्षण मंत्री होत्या. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर लखनौमधील ‘एसजीपीजीआय’ येथे उपचार सुरु होते. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाबाधित असल्याची माहिती आहे.

कमल राणी वरुण यांनी १९८९ मध्ये कानपूर महानगर परिषद सदस्यत्व मिळवत राजकीय प्रवास सुरु केला. १९९६ पासून सलग दोन वेळा त्यांनी खासदारकीही भूषवली होती. भाजपने २०१७ मध्ये कमल राणी यांना कानपूरमधील घाटमापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघातून विजयी झालेल्या त्या भाजपच्या पहिल्याच उमेदवार ठरल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांच्यावर कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कमल राणी वरुण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी, कॅबिनेट मंत्री श्रीमती कमल राणी वरुण यांच्या अकाली निधनाची बातमी क्लेशदायक आहे. राज्याने एक निष्ठावान नेता गमावला. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. त्या लोकप्रिय नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कॅबिनेटचा भाग असताना त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने निर्णय घेतले” अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या. योगींनी आपला अयोध्या दौराही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *