बिग ब्रेकिंग ! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण.

Amit shah corona test positive

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली. त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, “कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने मी कोविड १९ टेस्ट केली. यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी.”

amit shah corona test positive

येत्या ५ ऑगस्ट रोजी राममंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह सहभागी होणार होते. मात्र आज त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते आता राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *