चीनला अमेरिकेचा मोठा झटका, ‘टिकटॉक’ वर अमेरिकेतही बंदी.

tiktok banned in amerika

चीनला भारतानंतर आता अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. भारताने चीनच्या ५९ अॅप वर बंदी घातली. आता भारतानंतर अमेरिकेत टिकटॉक वरही बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की सुरक्षेचा धोका लक्षात घेता आम्ही टिकटॉक बंदी घालत आहोत.

एअरफोर्स वनवर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘जिथपर्यंत टिकटॉक चा प्रश्न आहे, आम्ही त्यावर बंदी घालतोय’. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अॅ,पवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. अनेक खासदार आणि एजन्सींनी टिकटॉक वर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप केला. ज्यानंतर आता अमेरिकेनेही टिकटॉक बंदी घातली आहे.

यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते, आम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही टिकटॉक वर बंदी घालू शकतो, तसेच आम्ही इतर काही पर्यायांवर विचार करीत आहोत. परंतु तो कोणत्या पर्यायांविषयी बोलत आहे हे त्यांनी स्पष्ट केले नाही. त्याचवेळी दोन प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रांनी असा दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत बाइटडान्सला सांगितले, टिकटॉक अमेरिकेच्या ऑपरेशन्सला देण्यात यावे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉक ची खरेदी करण्यासाठी सर्वात पुढे आहे. या दोन कंपन्यांमध्ये वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. परंतु, दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही.

चौफेर टिकेनंतर टिकटॉक आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याचा काम करत आहे. आपण चीनसाठी हेरगिरी करीत नाही. अलीकडेच, टिकटॉक चे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन मेयर म्हणाले की, टिकटॉक पारदर्शकतेसाठी वचनबद्ध आहे. आमचा राजकीय संबंध नाही. आम्ही राजकीय जाहिरात स्वीकारत नाही आणि कोणताही अजेंडा नाही – आमचे एकमेव उद्दिष्ट आहे की सर्वांनी आनंद घेण्यासाठी एक ज्वलंत, गतिमान व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. आज टिकटॉक हे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे, परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, आम्ही कोणाचेही शत्रू नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *