चंद्रपुरात कोरोनाचा पहिला बळी, रहमतनगर येथील रुग्णाचा कोरोनाने मृत्यू.

First Corona patient death in chandrapur

सुरवातीला कोरोनाच्या विळख्यापासून दूर असलेल्या चंद्रपुरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सध्यास्थितीत ५२३ वर पोहचली आहे. यामध्ये एकट्या चंद्रपूर शहराचा विचार केल्यास रुग्णसंख्या वाढत आहे . त्यापाठोपाठ ब्रह्मपुरी, मूल बल्लारपूर, राजुरा, कोरपना, भद्रावती या तालुक्याचा नंबर आहे.

आज १ ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या बळी गेला. हा कोरोनाबाधित २ दिवसआधी अमरावती जिल्ह्यातून चंद्रपूर मध्ये आला होता, ज्यावेळी तो आपल्या जिल्ह्यात दाखल झाला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान आज १ ऑगस्टला दुपारी त्या रुग्णाचा मृत्यू झाला, तो बाधित ३८ वर्षाचा होता, चंद्रपूर शहरातील रहमतनगरचा निवासी होता.प्रशासनाने नागरिकांना स्वतःची काळजी व सावधानता बाळगण्याचे निर्देश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *